BGT 2024 : बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत अश्विन विरुद्ध लियॉन, जाणून घ्या आकडेवारी
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. ही मालिका काही खेळाडूंसाठी शेवटची मालिका ठरू शकते. कारण त्यांचं वय पाहता पुन्हा बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका खेळण्याचा योग येणं कठीण आहे.
1 / 5
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. 22 नोव्हेंबरपासून पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. ही मालिका अश्विन विरुद्ध लियॉन अशी होण्याची शक्यता आहे. कारण या दोघांची बॉर्डर गावस्कर ही शेवटची मालिका आहे.
2 / 5
नॅथन लियॉन आणि रविचंद्रन अश्विन अव्वल गोलंदाज आहेत. दोघांनी या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक बळी घेतले आहेत. त्यामुळे या मालिकेत या दोघांपैकी कोण बाजी मारेल? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींमध्ये आहे.
3 / 5
नॅथन लियॉन सध्या या यादीत अव्वल स्थानावर आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत 26 सामने खेळलेल्या लियॉनने 7378 चेंडू टाकले आणि एकूण 116 विकेट घेतल्या.
4 / 5
बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत 22 सामने खेळलेल्या रविचंद्रन अश्विनने 7163 चेंडूत एकूण 114 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच अश्विन आणि लियॉनमधील विकेट्समधील फरक फक्त दोन विकेटचा आहे.
5 / 5
या मालिकेत कोण सर्वाधिक विकेट घेईल, तो शीर्षस्थानी दिसेल. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील ही कसोटी मालिका नॅथन लियॉन विरुद्ध रविचंद्रन अश्विन यांच्यातही असेल, यात शंका नाही.