IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिली अशी वागणूक
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तीन सामने संपले असून 1-1 ने बरोबरी आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामना मालिका विजय आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटी सामना खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना भारताची या सामन्यापूर्वी उपेक्षा करण्यात आली आहे.
1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. मेलबर्न येथील एमसीजी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ संघ तयारी करत आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाने भारताला सरावासाठी दिलेल्या खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
2 / 5
भारतीय संघाला सरावासाठी जुनी खेळपट्टी देण्यात आली आहे. या खेळपट्टीवर ठिकठिकाणी खड्डे असून खेळाडूंनी संताप व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत नाही. त्यामुळे ही खेळपट्टी काहीच कामाची नसल्याचं सांगण्यात येत आहे.
3 / 5
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाला सरावासाठी चांगली खेळपट्टी दिली आहे. एमसीजी प्रशासकीय समितीच्या भेदभावाबाबत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. असा प्रकार भारतात घडला असता तर कांगारूंनी थयथयाट केला असता.
4 / 5
एमसीजी क्युरेटर्सना याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, आम्ही आमच्याकडे असलेल्याच खेळपट्ट्या देऊ शकतो. सध्याची खेळपट्टी योग्य असल्याचं सांगून कृतीचं समर्थनही केलं आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया याबाबत काय म्हणजे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
5 / 5
चौथ्या कसोटी सामन्याच्या निकालावर दोन्ही संघांचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. आता या सामन्यात काय निकाल लागतो याची उत्सुकता आहे.