Captaincy | कॅप्टन Steve Smith याचा धमाका, विजयासह ऑस्ट्रेलियाची WTC Final मध्ये धडक

| Updated on: Mar 03, 2023 | 4:37 PM

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर इंदूरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवला. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक मारली.

1 / 5
सलग 2 सामने जिंकल्यानंतर अखेर टीम इंडियाला इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवत दमदार कमबॅक केलं. हंगामी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा या सुरु मालिकेतील पहिला विजय ठरला. कर्णधार म्हणून स्टीव्हने अनेक विक्रमही प्रस्थापित केले.

2 / 5
स्मिथची भारतातील कर्णधार म्हणून कामगिरी ही माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगच्या तुलनेत चांगली आहे. पॉन्टिंगने भारतात 7 सामन्यात नेतृत्व केलंय. मात्र पॉन्टिंगला आपल्या कॅप्टन्सीत ऑस्ट्रेलियाला भारतामध्ये एकही मॅचमध्ये विजय मिळवून देता आला नाही.

3 / 5
तर स्मिथने भारतात एकूण 5 टेस्टमध्ये कॅप्टन्सी केलीय.  स्टीव्हने या 5 पैकी 2 सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयी केलं आहे. स्मिथने इंदूरमधील विजयाआधी 2017 साली आपल्या कॅप्टन्सीत ऑस्ट्रेलियाला पुण्यात विजय मिळवून दिला होता.

4 / 5
टीम इंडिया विरुद्ध इंदूरमधील कसोटी सामना हा स्टीव्हचा कर्णधार म्हणून 37 सामन्यातील 21 वा विजय होता. स्टीव्ह 37 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत 5 व्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया विरुद्ध कसोटीत  रिकी पॉन्टिंग (29), स्टीव्ह वॉ (26) केन विलियमनस (22) आणि मायकल वॉर्न (22) सामन्यात विजय मिळवला आहे.

5 / 5
स्मिथने ऑस्ट्रेलियाचं 37 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलंय. यातील 21 सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिलाय. 10 सामन्यात पराभव झालाय. तर 6 सामने अनिर्णित राहिलेत. तर भारतात स्टीव्हच्या नेतृत्वात 5 पैकी 2 सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी झालीय. तर 2 सामन्यात पराभव आणि उर्वरित 1 मॅच अनिर्णित राहिलीय.