MS DHONI : शस्त्रक्रियेपूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या हाती भगवद् गीता, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
आयपीएल 2023 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद पटकावलं. या स्पर्धेत एमएस धोनीच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
1 / 5
आयपीएल 2023 स्पर्धा संपल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. अंतिम सामना पार पडल्यानंतर मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात धोनी दाखल झाला. 31 मे रोजी गुडघ्याची तपासणी करण्यात आणी आणि 1 जून रोजी सकाळी गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
2 / 5
31 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या लीगमधील पहिल्या सामन्यात धोनीला दुखापत झाली होती. पण चेन्नई सुपर किंग्स संघाला चॅम्पियन करण्याच्या भावनेने धोनीला त्याच्या गुडघ्याची चिंता नव्हती. दरम्यानच्या काळात धोनीचे मैदानावर काहीवेळा दुखण्यामुळे लंगडत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते.
3 / 5
धोनीचे ऑपरेशन डॉक्टर दिन शाह परडीवाला यांनी केले. ऋषभ पंतच्या शस्त्रक्रियेत डॉ. परडीवाला यांची प्रमुख भूमिका होती. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर धोनी सध्या रुग्णालयात असल्याची माहिती मिळते आहे.
4 / 5
या शस्त्रक्रियेपूर्वीचा धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोमध्ये धोनी हातात भगवद्गीता धरून कारमध्ये बसलेला दिसत आहे.
5 / 5
गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर धोनीला यातून सावरण्यासाठी काही महिने लागतील, असे वृत्त आहे. तसेच, निवृत्तीबाबत बोलणाऱ्या धोनीने सांगितले की, त्याच्याकडे याबाबत निर्णय घेण्यासाठी 6 ते 7 महिने आहेत.धोनी पूर्णपणे तंदुरुस्त झाला तर तो आणखी एक हंगाम खेळण्याची शक्यता आहे.