बॉक्सिंग डे कसोटी सामना तीन संघांसाठी महत्त्वाचा, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित समजून घ्या

| Updated on: Dec 24, 2024 | 3:16 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित अंतिम टप्प्यात आलं आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे तीन संघ शर्यतीत आहेत. यापैकी दोन संघांना अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. असं असताना तिन्ही संघांसाठी बॉक्सिंग डे कसोटी सामना महत्त्वाचा आहे.

1 / 5
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी अर्थात 26 डिसेंबरला चार संघ आमनेसामने येणार आहेत. चार संघापैकी तीन संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात थेट लढत आहे. त्यामुळे अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

2 / 5
26 डिसेंबर रोजी दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात सेंच्युरियन मैदानात सामना होणार आहे. दक्षिण अफ्रिकेसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकताच अंतिम फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तान या शर्यतीतून कधीच आऊट झाला आहे.

3 / 5
26 डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामनाही सुरु होणार आहे. या सामन्यात विजय मिळवताच टीम इंडियाचा अंतिम फेरीतील मार्ग सुकर होणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणं तितकं महत्त्वाचं आहे.

4 / 5
टीम इंडियाने मेलबर्न आणि सिडनी कसोटी जिंकल्यास अंतिम फेरीतील स्थान पक्क होईल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत केलं तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटी खूपच महत्त्वाची आहे.

5 / 5
बॉक्सिंग डे कसोटी तीन संघांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं भवितव्य ठरवणार आहे. त्यामुळे आता कोणता संघ अंतिम फेरीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.