जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी पेले यांनी शेवटचा श्वास घेतला.
त्यांना कोलन कॅन्सर झाला होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं पेले यांना 29 नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पेले यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पेले यांना जगातील महान खेळाडूंपैकी एक मानलं जातं. तीन वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणारे पेले हे एकमेव खेळाडू आहे.
1958, 1962 आणि 1970 मधील तीन वर्ल्ड कप त्यांनी जिंकले. ब्राझीलसाठी संयुक्तपणे सर्वाधिक गोल करणारे ते एकमेव खेळाडू होते. त्यांनी 92 सामन्यात 77 गोल केले होते.