कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, तिसऱ्या सामन्यातील विजयाने नोंदवला असा विक्रम

| Updated on: Jan 18, 2024 | 5:33 PM

अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा टी20 सामना जिंकताच कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यशस्वी कर्णधारांच्या यादीत मानाचं स्थान मिळवलं आहे. तर भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं आहे.

1 / 6
भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन सुपर ओव्हर खेळव्या लागल्या. पण शेवटी विजय भारताच्या पदरात पडला.

2 / 6
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने विजयासाठी 16 धावा दिल्या होत्या. पण भारताने 16 धावा करत सामना बरोबरीत सोडवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने 11 धावा करत विजयासाठी 12 धावा दिल्या होत्या. पण अफगाणिस्तानला फक्त एक धाव करता आली.

3 / 6
तिसऱ्या सामन्यातील विजयासह कर्णधार रोहित शर्माचं नाव खास यादीत सामील झालं आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून त्याची नोंद झाली आहे.

4 / 6
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्वाधिक टी20 सामने जिंकले होते. टी20 क्रिकेटमध्ये 72 सामन्यात महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व केलं आणि एकूण 41 सामन्यात विजय मिळवला आहे.

5 / 6
रोहित शर्माने 25 टी20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आणि 42 सामन्यात विजय मिळवला आहे. टी20 क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात फक्त 12 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

6 / 6
इंग्लंडचा इयॉन मॉर्गन, पाकिस्तानचा बाबर आझम आणि अफगाणिस्तानचा असगर अफगानी याच्या नेतृत्वात त्या त्या संघांनी 42 वेळा टी20 क्रिकेटमध्ये विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आता यांच्या पंगतीत बसला असून एक विजय सर्वांचे विक्रम मोडीत काढेल.