चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला. संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्त्झे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून त्याला पाठदुखीचा त्रास जाणवत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत कमबॅक करेल असं वाटत होतं. त्याच पार्श्वभूमीवर एनरिक नोर्त्झेला संघात स्थान दिलं होतं.
पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत नॉर्त्झे पूर्णपणे बरा होईल अशी शक्यता नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. नोर्त्झे संघात नसल्याने दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसेल.
गेल्या काही वर्षांपासून कागिसो रबाडासह एनरिक नोर्त्झे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला नोकीच्या जागी दुसरा वेगवान गोलंदाज निवडावा लागेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जॅन्सेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, टॅबरे, रस्सी व्हॅन डर डुसेन, ट्रिस्टन स्टब्स.