चेन्नई सुपर किंग्स टीमच्या मराठमोळ्या गोलंदाजाचा साखरपुडा उरकला, लवकरच बोहल्यावर चढणार!

| Updated on: Jun 13, 2023 | 3:06 PM

चेन्नई सुपर किंग्सच्या ऋतुराज गायकवाडनंतर आता तुषार देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तुषारचा लहानपणीच्या मैत्रिणीसोबत साखरपुडा झाला आहे. तुषारने फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

1 / 6
आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी लंदाजी करणाऱ्या तुषार देशपांडेचा साखरपुडा झाला आहे. तुषारचे नभा गडमवार हिच्यासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नभा आणि तुषार हे बालपणीचे मित्र आहेत.

2 / 6
तुषारला शाळेच्या दिवसांपासूनच नभा आवडायची. साखरपुड्यानंतर त्याने स्वतः फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. कसोटी क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा लाल चेंडूही तुषारच्या एंगेजमेंटमध्ये ठेवण्यात आला होता.

3 / 6
नभा या व्यवसायाने चित्रकार असून त्या भेटवस्तू डिझाइन करतात. तिचे एक इंस्टाग्राम पेज आहे जिथे ती तिच्या पेंटिंग्ज आणि इतर कामांची छायाचित्रे शेअर करत असते.

4 / 6
चेन्नईचा अष्टपैलू शिवम दुबे आणि त्याची पत्नी अंजुम खानही तुषार देशपांडेच्या एंगेजमेंटला आले होते. क्रिकेटपटू ध्रुमिलनेही एंगेजमेंटला हजेरी लावली होती.

5 / 6
तुषार देशपांडे आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने 16 सामन्यात 21 विकेट घेतल्या. चेन्नई संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.

6 / 6
आयपीएलमध्ये एकूण 23 सामने खेळलेल्या तुषारने या मोसमातच चमकदार कामगिरी केली आहे. याआधी तो एकूण सात आयपीएल सामने खेळला होता आणि त्याला फक्त चार विकेट घेता आल्या होत्या. या मोसमातील चमकदार कामगिरीनंतर भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यताही वाढली आहे.