चेतेश्वर पुजारा पुन्हा चमकला, 66 व्या शतकासह अनेक विक्रमांना गवसणी

| Updated on: Oct 21, 2024 | 3:39 PM

वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेनंतर चेतेश्वर पुजाराला टीम इंडियातून वगळण्यात आलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत चेतेश्वर पुजारा कमबॅकसाठी प्रयत्न करत आहे. चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी स्पर्धेत शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

1 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर पुजारा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याने शतक ठोकून अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

2 / 6
रणजी स्पर्धेतील ड गटात सौराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यात राजकोट येथे सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना छत्तीसगडने 7 गडी गमवून 578 धावा केल्या आणि डाव घोषित केला. सौराष्ट्रकडून डावाची सुरुवात करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने चांगली फलंदाजी केली.

3 / 6
तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या चेतेश्वर पुजाराने 197 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. पुजाराचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे 66वं शतक होतं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराला मागे टाकलं आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 65 शतकं ठोकली आहेत.

4 / 6
चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 21 हजार पूर्ण केल्या आहेत. प्रथम श्रेणीत असा पल्ला गाठणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. सुनील गावस्करने 25834, सचिन तेंडुलकरने 25396, राहुल द्रविडने 23784 धावा केल्या आहेत.

5 / 6
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर 81 शतकांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी आहेत. राहुल द्रविड 68 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर 66 शतकांसह पुजारा आता तिसऱ्या स्थानावर आहे.

6 / 6
सौराष्ट्रच्या 5 गडी बाद 400 पार धावसंख्या झाली आहे. तसेच चेतेश्वर पुजारा 200 धावांच्या उंबरठ्यावर उभा आहे. चेतेश्वर पुजाराने उत्तराखंडला कडवी झुंज देत आहे. त्याला बाद करताना उत्तराखंडच्या गोलंदाजांचा घाम निघाला आहे.