Ambati Rayudu : अंबाती रायडु नव्या इनिंगसाठी सज्ज, या राजकीय पक्षाच्या टीममध्ये होणार सहभागी
अंबाती रायडू आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटमधून थेट आता राजकारणात प्रवेश करणार असल्याचं जोरदार चर्चा आहे. लोकसभेसाठी त्याने तयारी सुरु केल्याचं बोललं जात आहे.
1 / 6
चेन्नई सुपर किंग्ज आणि टीम इंडियाचा माजी फलंदाज अंबाती रायडू यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांची भेट घेतली. माजी क्रिकेटपटूने मुख्यमंत्र्यांसोबत ताडेपल्ली कॅम्प ऑफिसमध्ये चर्चा केली.
2 / 6
ही बैठक अर्ध्या तासाहून अधिक काळ चालली. यानंतर त्याने आयपीएल ट्रॉफी आणि सीएसकेची खास जर्सी दिली.
3 / 6
आयपीएल 16व्या पर्वात चेन्नईने जेतेपद पटकावलं. या सामन्यापूर्वी क्रिकेट जगताला अलविदा करणारा टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू अंबाती रायुडू दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे.
4 / 6
या भेटीनंतर रायुडू आपली राजकीय खेळी सुरू करणार असल्याच्या अटकळांना जोर आला आहे. अंबाती रायडू सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
5 / 6
सूत्रांनुसार, मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनीही रायडूला पक्षात प्रवेश घेण्याची परवानगी दिली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकी लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतो.
6 / 6
अंबाती रायुडू हा वायएस जगन यांचा मोठा चाहता आहे. वायएस जगन यांचे सोशल मीडिया अकाउंट फॉलो करत आहे. ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही सक्रिय आहे.