AUS vs PAK | डेव्हिड वॉर्नर-मिचेल मार्श जोडीचा धमाका, वर्ल्ड कपमध्ये रेकॉर्डब्रेक पार्टनरशीप
David Warner Mitchll Marsh | ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या दोघांनी धुव्वाधार शतकी खेळी केली. या दरम्यान दोघांनी मोठा रेकॉर्ड केला आहे.
1 / 5
डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम मोडला आहे.
2 / 5
डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या दोघांनी ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्ड कपमध्ये विक्रमी सलामी भागीदारी केली आहे. या दोघांनी ब्रॅड हॅडीन आणि शेन वॉटसन याचां रेकॉर्ड ब्रेक केला.
3 / 5
ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॅडीन आणि शेन वॉटसन या जोडीने 2011 वर्ल्ड कपमध्ये 183 धावांची ओपनिंग पार्टनरशीप केली होती. तेव्हा कॅनडा या लिंबूटिंबु टीम विरुद्ध या दोघांनी हा कारनामा केला होता.
4 / 5
ऑस्ट्रेलियाकडून मॅककॉस्कर आणि टर्नर या जोडीने पहिल्या विकेटसाठी 182 धावा केल्या होत्या. या दोघांनी श्रीलंका विरुद्ध 1975 च्या विश्व चषकात ही कामगिरी केली होती.
5 / 5
तर मॅथ्यु हेडन आणि एडम गिलख्रिस्ट या दोघांनी श्रीलंका विरुद्ध 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये तडाखेदार 172 धावांची सलाममी भागदारी करत टीमला जोरदार सुरुवात मिळवून दिली होती.