IPL आणि WPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सला गुणतालिकेत टॉपला राहणं पडलं महागात, जाणून घ्या आकडेवारी
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. असं वुमन्स प्रीमियर लीगमध्येच नाही तर आयपीएलमध्येही दिल्ली कॅपिटल्ससोबत झालं आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी राहणं चांगलंच महागात पडलं आहे. चला जाणून घेऊयात कधी कधी अशी वेळ आली ते..
1 / 6
वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सला 8 विकेट्सने पराभूत केलं. सलग दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सला पराभावाचं तोंड पाहावं लागलं आहे. पण यासोबत दिल्ली कॅपिटल्ससोबत एक मिस्ट्री जुळून आली आहे. वुमन्स प्रीमियर लीग आणि इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी राहणं महागात पडलं आहे.
2 / 6
वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या साखळी फेरीत 8 पैकी 6 सामने जिंकून दिल्ली कॅपिटल्स संघ अव्वल स्थानी राहिला. तसेच थेट अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभूत केलं.
3 / 6
वुमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीत 8 पैकी 6 सामने जिंकून दिल्लीने अंतिम फेरी गाठली होती. गुणतालिकेत टॉपला असल्याने विजयाची खात्री होती. पण अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने 7 गडी राखून पराभूत केलं.
4 / 6
आयपीएल 2009 मध्ये दिल्ली डेअरडेविल्स (आता दिल्ली कॅपिटल्स)संघ 14 पैकी 10 सामने जिंकू अव्वल स्थानी होता. पण उपांत्य फेरीत डेक्कन चार्जर्सने 6 विकेट्सने पराभूत केलं.
5 / 6
आयपीएल 2012 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 16 पैकी 11 सामने जिंकले आणि प्वॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान गठलं. प्लेऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना झाला. यावेळी 18 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर दुसऱ्या क्वॉलिफायर राउंडमध्ये चेन्नईने 86 धावांनी पराभूत केलं.
6 / 6
आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने 14 पैकी 10 सामने जिंकून 20 गुण मिळवले. प्लेऑफमध्ये पहिल्या क्वालिफायरमद्ये चेन्नई सुपर किंग्सने 4 विकेट्सने पराभूत केलं. तर दुसऱ्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये केकेआरने 3 विकेट्सने पराभूत केलं.