महेंद्रसिंह धोनी 14 सप्टेंबर 2007 साली टीम इंडियाच्या कर्णधारपदी विराजमान झाला होता. टी20 वर्ल्डकप 2007 मध्ये कर्णधार म्हणून पाकिस्तान विरुद्ध पहिला टी20 सामना खेळला होता. महेंद्रसिंह धोनी याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता फक्त आयपीएल खेळतो.
महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात पहिला सामना 13 सप्टेंबरला खेळला जाणार होता. हा सामना स्कॉटलँड विरुद्ध होता. पण या सामन्यात पाऊस पडल्याने होऊ शकला नाही.
कर्णधारपदाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानसारख्या टीमला पराभूत केलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. अनेक स्पर्धांमध्ये जेतेपद जिंकत महान कर्णधारांच्या यादीत नाव नोंदवलं.
धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. तसेच 5 आयपीएल ट्रॉफीही त्याच्या नावावर आहेत.
धोनीच्या गळ्यात जेव्हा कर्णधारपदाची माळ पडली तेव्हा संघात वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंह होते. पण निवड समितीने कर्णधारपदाची माळ धोनीच्या गळ्यात घातली.
महेंद्रसिंह धोनी याने कर्णधारपदाबाबत सांगितलं की, "खेळाची समज आणि योग्यतेमुळेच कर्णधारपद मिळालं होतं. जेव्हा सीनियर त्यांना काही विचारायचे तेव्हा आपलं मत न घाबरता मांडायचो."