IND vs ENG : रोहित शर्माने कसोटीत इतके षटकार ठोकताच मोडणार धोनीचा विक्रम, जाणून घ्या काय ते
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दृष्टीने भारत आणि इंग्लंडमध्ये महत्त्वाची कसोटी मालिका होत आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला क्लिन स्विप दिला तर अंतिम फेरीची वाट सोपी होईल. असं असताना या मालिकेत रोहित शर्माने षटकार ठोकताच आणखी एक विक्रम नावावर होणार आहे.
1 / 6
इंग्लंडचा संघ भारतात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी आला आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इंग्लंडला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लिन स्विप दिला तर गुणतालिकेत टीम इंडिया पहिल्या स्थानावर पोहोचेल.
2 / 6
25 जानेवारीपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या कसोटी सामन्यात रोहित शर्माला एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
3 / 6
इंग्लंडविरुद्ध कसोटीत 3 षटकार ठोकतान भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटाकर ठोकणारा कर्णधार ठरणार आहे. भारताकडून या यादीत अव्वल स्थानी धोनीचं नाव आहे. धोनीने 311 डावात 211 षटकार मारले आहेत.
4 / 6
रोहित शर्माने 116 डावात 209 षटाकर मारले आहेत. त्यामुळे तीन षटकार ठोकताच हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होणार आहे. विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानावर असून 250 डावात 138 षटकार मारले आहेत.
5 / 6
कसोटीत रोहित शर्माने 54 सामन्यात एकूण 77 षटकार मारले आहे. भारताकडून या यादीत वीरेंद्र सेहवाग आघाडीवर आहे. त्याने 104 कसोटी सामन्यात 91 षटकार मारले आहेत. तर धोनीने 90 कसोटीत 78 षटकार मारले आहेत.
6 / 6
कसोटी सामन्यात रोहित शर्माने दोन षटकार ठोकले तर महेंद्रसिंह धोनी मागे टाकेल. भारताकडून कसोटीत षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी येईल.