Dhruv Jurel | एकटाच भिडला, पूरुन उरला, ध्रुव जुरेलचा वन मॅन आर्मी शो

| Updated on: Feb 26, 2024 | 3:11 PM

Dhruv Jurel IND vs ENG 4Th Test | ध्रुव जुरेल याने टीम इंडियासाठी इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात एकूण 129 धावा केल्या. ध्रुवने पहिल्या डावात 90 आणि दुसऱ्या डावात नाबाद 39 धावांची खेळी केली.

1 / 5
ध्रुव जुरेल या माजी सैनिकाच्या मुलाने टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. ध्रुव जुरेलने आपल्या बॅटिंगने वन मॅन आर्मी शो दाखवून दिला.

2 / 5
ध्रुव जुरेल याने टीम इंडिया दोन्ही डावात अडचणीत असताना तारणहाराची भूमिका बजवली. ध्रुवने केलेल्या कामगिरीमुळे सामन्याला कलाटणी मिळाली आणि सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकला.

3 / 5
ध्रुव जुरेल याने इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात चिवट खेळी केली. ध्रुवने 90 धावांची झुंजार खेळी केली. ध्रुवच्या या खेळीत 6 चौकार आणि 4 सिक्सचा समावेश होता.

4 / 5
तर ध्रुवने दुसऱ्या डावात नाबाद 39 धावा केल्या. ध्रुवने टीम इंडिया अडचणीत असताना शुबमन गिल याच्यासोबत सहाव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं.

5 / 5
टीम इंडियाने चौथ्या कसोटी सामन्यासह 5 सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली. टीम इंडियाचा हा मायदेशातील सलग 17 वा मालिका विजय ठरला.