आयपीएल 2024 लिलावात आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मोठी बोली लावत ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजी मिचेल स्टार्कला ताफ्यात घेतलं आहे. त्यामुळे आयपीएलची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळत असावेत याबाबत उत्सुकता वाढली आहे. चला जाणून घेऊयात टॉप 10 खेळाडूंबाबत
मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे. या लिलावाद्वारे स्टार्कला केकेआरने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले.
ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्स हा आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधाराला सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले.
पंजाब किंग्ज फ्रँचायझीने आयपीएल 2023 च्या लिलावाद्वारे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला 18.5 कोटी रुपयांना विकत घेतले.यावेळी सॅम करन 18.5 कोटींची कमाई करेल.
आयपीएलच्या मागच्या पर्वातील लिलावात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मुंबईने रिलीज केल्यानंतर आरसीबीने ट्रेड केला आहे. आरसीबीने ग्रीनसाठी 17.5 कोटी रुपये मोजले आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीने केएल राहुलला 2022 मध्ये 17 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानुसार लखनऊ संघाच्या कर्णधाराला यावेळीही 17 कोटी रुपये मिळणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या रोहित शर्माचा सध्याचा पगार 16 कोटी रुपये आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा याला फ्रेंचायसीने 16 कोटी रुपयांचं मानधन दिलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतला 16 कोटी रुपयांचं मानधन मिळत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला केकेआरने मागील 2 हंगामांसाठी 16 कोटी रुपये दिले आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनला LSG फ्रँचायझीकडून दिलेली रक्कम 16 कोटी रुपये आहे.
विराट कोहलीला आरसीबीकडून केवळ 15 कोटी रुपये मानधन दिले जाते. विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून आरसीबीसोबतच आहे.