जगातील सर्वात श्रीमंत लीग म्हणून ख्याती असलेली आयपीएल स्पर्धा २२ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना कोट्यवधि रुपये मिळतात. आयपीएलमध्ये खेळाडूंसोबत पंचांनाही मोठी रक्कम मिळते.
एलिट पंच हे आयसीसी एलिट पॅनेलचा भाग असतात, यात जगभरातील अव्वल पंचांचा समावेश असतो. त्यांनी आंतरराष्ट्रीय सामने आणि प्रमुख स्पर्धांमध्ये पंचगिरी केलेली असते. एलिट पंचांना प्रति सामन्याचे शुल्क १,९८,००० रुपये मिळते आणि त्यांना १२,५०० रुपये दैनिक भत्ता मिळतो.
अनिल चौधरी, शमसुद्दीन, ख्रिस गॅफनी, नितीन मेनन, के.एन. अनंतपद्मनाभन, पॉल रायफल आणि ब्रूस ऑक्सेनफोर्ड हे एलिट पंचांपैकी आहेत आणि त्यांना एका सामन्याचे पंच म्हणून १,९८,००० रुपये मिळतात.
डेव्हलपमेंटल पंच हे प्रादेशिक पंच असतात जे प्रामुख्याने देशांतर्गत सर्किटमध्ये पंचगिरी करतात. पंचगिरीचा अनुभव मिळविण्यासाठी त्यांना हळूहळू आयपीएलमध्ये संधी दिल्या जाते. डेव्हलपमेंटल पंचांना प्रति सामना ५९,००० रुपये फी मिळते.
एलिट पंचांना प्रत्येक हंगामात सामना शुल्काव्यतिरिक्त अंदाजे ७,३३,००० रुपये मिळतात. याशिवाय, पंचांना प्रवास आणि निवासासाठी भत्ता देखील मिळतो. (सर्व छायाचित्र सौजन्य: X / इंस्टाग्राम)