Cricket : क्रिकेट इतिहासात सर्वात वजनदार बॅट वापरणारे फलंदाज माहिती आहेत का? जाणून घ्या
आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारे फलंदाज आपण पाहिले आहे. यापैकी काही फलंदाज सर्वात वजन बॅट वापरायचे. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. चला जाणून कोण किती किलोची बॅट वापरायचं ते..
1 / 7
क्रिकेटमध्ये एका एका धावेचं किती महत्त्व हे आपण पाहिलं आहे. एक धाव विजय आणि पराभव ठरवते. असं असताना क्रिकेट इतिहासात खोऱ्याने धावा करणाऱ्या फलंदाजांची चर्चा होत असते. यात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? किती किलोची बॅट वापरतात ते..
2 / 7
क्रिकेटमध्ये जड फलंदाजांपेक्षा हलकी बॅट शोधणारे जास्त आहेत. कारण वजनदार बॅट पकडण्याचा विक्रम आजही सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. चला तर मग पाहूयात यात कोण आहेत ते...
3 / 7
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर क्रिकेटच्या इतिहासात 100 शतकांचा विक्रम आहे. यातील बहुतांश शतके त्याने जड बॅटने झळकावली आहेत. सचिन एकावेळी 1.47 किलो वजनाची बॅट वापरत होता. यापेक्षा जड बॅट कोणत्याही क्रिकेटपटूने अद्याप तरी वापरली नाही.
4 / 7
युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल स्पार्टन सीजी कंपनीची 1.36 किलोची बॅट वापरत होता.
5 / 7
टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1.35 किलोच्या बॅटने 319 धावा केल्या होत्या.
6 / 7
टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने 1.27 किलो वजनाची बॅट वापरत होता.
7 / 7
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 1.24 किलो वजनी बॅटने वापरायचा.