Duleep Trophy 2024 : विकेटकीपर ध्रुव जुरेलने महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी केली बरोबरी, काय ते जाणून घ्या

| Updated on: Sep 08, 2024 | 3:50 PM

ध्रुव जुरेल टीम इंडियासाठी तीन कसोटी सामने खेळला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी होणाऱ्या संघ निवडीसाठी शर्यतीत आहे. त्याने तीन कसोटीत एक अर्धशतकासह 90 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याने एक मोठा विक्रम रचला आहे. तसेच महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं आहे.

1 / 5
बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. यासाठी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा निवड समिती विचार करणार आहे. या सामन्यात विकेटकीपर  ध्रुव जुरेलने एक विक्रम रचला आहे. तसेच महेंद्रसिंह धोनीसोबत देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरोबरी साधली आहे.

2 / 5
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये इंडिया ए आणि इंडिया बी या सामन्यात ध्रुव जुरेलने कमाल केली. दुसऱ्या डावात ध्रुव जुरेलने एकूण 7 विकेट घेतल्या. तसेच दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एकाच डावात सर्वाधिक झेल घेणाऱ्या धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

3 / 5
महेंद्रसिंह धोनीने 2004 साली देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ही कामगिरी केली होती. सेंट्रल झोनविरुद्धच्या सामन्यात पूर्व विभागाकडून धोनीने 7 झेल घेतले होते. तेव्हापासून 20 वर्षे या विक्रमाशी कोणीच बरोबरी केली नव्हती.

4 / 5
20 वर्षानंतर ध्रुव जुरेलला या विक्रमशी बरोबरी साधता आली. भारत अ संघासाठी उत्कृष्ट विकेटकीपिंग केली आणि भारत ब संघाला 184 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. पण फलंदाजीत तशी कामगिरी करता आली नाही. शून्यावर बाद झाल्याने निवड कठीण झालं आहे.

5 / 5
ध्रुव जुरेलने 7 पैकी 4 झेल हे आकाश दीपच्या षटकात घेतले. आकाश दीपच्या भेदक गोलंदाजीमुले इंडिया बी संघाचा डाव गडगडला. त्याने 14 षटकात 56 धावा देत 5 गडी बाद केले. त्याचा विचार कसोटी मालिकेसाठी होऊ शकतो.