Duleep Trophy 2024 : मुशीर खानने सचिन तेंडुलकरचा 33 वर्ष जुना विक्रम काढला मोडीत, काय ते जाणून घ्या

| Updated on: Sep 06, 2024 | 5:32 PM

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे सामना होत आहे. या स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया बी संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात मुशीर खानने शतकी खेळी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात त्याने ही कमाल केली.

1 / 5
इंडिया बी संघाची स्थिती नाजूक असताना मुशीर खानने जबरदस्त खेळी केली. 97 वर 7 गडी बाद अशी स्थिती होती. मुशीरने 181 धावा करत टीमला 300 पार धावा करण्यात मदत केली. 373 चेंडूचा सामना करत 16 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 181 धावा केल्या.

2 / 5
मुशीर खानने या खेळीसह नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 20 पेक्षा कमी वयात मोठी धावसंख्या करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

3 / 5
मुशीर खानने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने 1991 मध्ये दुलीप ट्रॉफीत पदार्पणाच्या सामन्यात 159 धावांची खेळी केली होती.

4 / 5
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बाबा अपराजित आघाडीवर आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यात 212 धावा केल्या होत्या. तर यश ढुल दुसऱ्या स्थानावर असून 193 धावा केल्या आहेत.

5 / 5
मुशीर खानने अंडर 19 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत चांगली खेळी केली होती. सात सामन्यात 60 च्या सरासरीने 360 धावा केल्या होत्या. तसेच 7 विकेट घेतल्या होत्या.