Run Out | 2023 वर्षातील 5 विचित्र रन आऊट, पाहून तुम्ही डोक्यावर हात माराल
Run Out | धाव घेण्याच्या प्रयत्नात अनेक बॅट्समन रन आऊट होतात. रन पूर्ण करण्यासाठी अनेक फलंदाज हे उडी मारुन रन पूर्ण करतात. मात्र हे 5 बॅट्समन ज्या प्रकारे रन आऊट झालेत, ते पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
1 / 6
चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत अनेक असंख्य क्रिकेटपटू रन आऊट झाले आहेत. आपण 2023 मध्ये विनोदी आणि विचित्र पद्धतीने रन आऊट झालेल्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत. ज्या पद्धतीने हे फलंदाज रनआऊट झाले, ते पाहून तुमचा विश्वास बसणार नाही.
2 / 6
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा मायकल ब्रेसवेल हा आळशीपणामुळे रन आऊट झाला.
3 / 6
आयपीएल 2023 एलिमिनेटरमध्ये मार्क्स स्टोयनिस याच्यानंतर दीपक हुड्डा रन आऊट झाला. आयुष बदोनी याने मारलेला फटका मारला. आयुष आणि दीपक रनसाठी धावत सुटले. मात्र उंचपुऱ्या कॅमरुन ग्रीनने झेप घेत बॉल रोखला. ग्रीनने बॉल विकेटकीपरच्या दिशेने फेकला. हे पाहिल्यानंतर आयुषने नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने जाण्याऐवजी परत स्ट्राईक एंडवर उलट धात आला. तर दीपकही स्ट्राईक एंडच्या दिशेने धावत आला. हे पाहून आकाश मधवाल याने रोहित शर्मा च्या दिशेने नॉन स्ट्राईक एंडवर बॉल फेकला आणि दीपकला रन आऊट केलं.
4 / 6
बिग बॅश लीग 2023 फायनलमध्ये ब्रिस्बेन हीट विरुद्ध पर्थ स्कॉचर्सचा बॅट्समन स्टीफन एस्किनजी रन आऊट झाला. आता नीट रन पूर्ण करायचं तर हा जॉगिंग करत राहिला, हे पाहून मॅक्स ब्रयांट याने डायरेक्ट थ्रो केला आणि एस्किनचीचा टप्प्यात कार्यक्रम केला.
5 / 6
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल एलिमिनेटर 2023 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लखनऊचा मार्कस स्टोयनिस हा सहकारी बॅट्समन दीपक हुड्डा याला धडकल्याने रन आऊट झाला. स्टोयनिसने फटका मारुन 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव दोघांनी पूर्ण केली. मात्र दुसरी धाव घेताना दीपक आणि स्टोयनिस दोघे एकमेकांना धडकले. त्यामुळे स्टोयनिस वेळत पोहचू शकला नाही, परिणामी तो रनआऊट झाला.
6 / 6
न्यूझीलंडचा फिन एलेन 16 जुलैला अशाच विचित्रप्रकारे रन आऊट झाला. फटका मारल्यानंतर फिन नॉन स्ट्राईक एंड दिशेने जात होता. फिन आरामात पोहचू शकला असता. पण आळस अंगाशी आला आणि कार्यक्रम झाला.