वूमन्स टीम इंडियाने बांगलादेशवर मात करत एमर्जिंग एशिया कप जिंकला. टीम इंडिया फक्त 2 सामन जिंकून एशिया चॅम्पियन ठरलीय. मात्र इथवरच्या प्रवासात श्रेयांका पाटील हीने निर्णायक भूमिका बजावली.
टीम इंडिया फक्त 2 सामने जिंकून एशिया चॅम्पियन ठरली. टीम इंडियाने या स्पर्धेत हाँगकाँग विरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर नेपाळ आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामना हा पावसामुळे रद्द झाला. तर आता अंतिम सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला.
श्रेयांका पाटीलने हीने या स्पर्धेत टीम इंडियाकडून खेळताना फक्त 2 सामन्यात 7 ओव्हर्स टाकल्या. या 7 पैकी 1 ओव्हर मेडन टाकली. श्रेयांकाने अवघ्या 15 धावांच्या मोबदल्यात 9 विकेट्स घेतल्या.
श्रेयांकाने हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 3 ओव्हर बॉलिंग टाकली. यापैकी 1 मेडन ओव्हर टाकली. श्रेयांकाने या स्पेलमध्ये अवघ्या 2 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
तर आता बांगलादेश विरुद्ध श्रेयांकाने 4 विकेट्स घेतल्या. श्रेयांका यासह या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी बॉलर ठरली. श्रेयांकाला या कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं.