ENG vs PAK : इंग्लंड कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचणार! पाकिस्तानसोबत पहिल्यांदाच असं होणार
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना मुल्तानमध्ये सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानच वस्त्रहरण केलं आहे. पहिला कसोटी सामना गमवण्याच्या वेशीवर पाकिस्तान येऊन ठेपला आहे.
1 / 5
इंग्लंड पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकणार अशीच स्थिती आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 823 धावा करत डाव घोषित केला. तसेच 276 धावांची आघाडी घेतली.
2 / 5
दुसऱ्या डावात ही आघाडी मोडून काढतानाच पाकिस्तानचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला आहे. चौथ्या दिवसअखेर पाकिस्तानने 6 गडी गमवून 152 धावा केल्या आहेत. अजूनही इंग्लंडकडे 115 धावांची आघाडी आहे. पाकिस्तानच्या हातात फक्त 4 विकेट आहेत.
3 / 5
इंग्लंडने पाकिस्तानच्या उर्वरित विकेट 115 धावांच्या आत घेतल्या तर एक इतिहास रचला जाईल. कसोटीत पहिल्यांदाच 500 किंवा त्याहून अधिक धावा करूनही पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागणार आहे.
4 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक धावा करून सामना गमवण्याची ही नववी वेळ असेल. पण पहिल्या डावात 500 धावा केल्या आणि एका डावाने पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
5 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा 6 गोलंदाजांनी 100 हून अधिक धावा दिल्याचा नकोसा विक्रम झाला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा नावावर होता. (Photo : X)