ENG vs SL: जो रुटचा लॉर्ड्समध्ये धमाका, रेकॉर्ड्सचा पंच

| Updated on: Sep 01, 2024 | 7:08 PM

Joe Root England vs Sri Lanka: जो रुट याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात बॅटिंग करताना शतक ठोकलं. रुटने यासह अनेक दिग्ग्जांना मागे टाकलं. रुटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

1 / 6
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट याने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातही शतक ठोकलं. रुटने अशाप्रकारे 34 कसोटी शतकांचा टप्पा गाठला. रुटने या शतकासह लॉर्ड्स या ऐतिहासिक स्टेडियममध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.  (Photo Credit : Icc X Account)

2 / 6
जो रुट इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी शतकं झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रुटने याबाबत माजी कर्णधार आणि फलंदाज एलिस्टर कूक याला मागे टाकलं आहे. कूकने कसोटीत 33 शतकं ठोकली होती.  (Photo Credit : Icc X Account)

3 / 6
जो रुटचं हे लॉर्ड्समधील एकूण सातवं शतकं ठरलं. रुट अशी कामगिरी करणारा पहिला इंग्रज फलंदाज ठरला. रुटआधी मायकल वॉन आणि ग्रॅहम गूच या दोघांनी प्रत्येकी 6-6 शतकं झळकावली होती.  (Photo Credit : Icc X Account)

4 / 6
जो रुट लॉर्ड्समध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रुटने याबाबतीत ग्रॅहम गूच याचा विक्रम मोडीत काढला आहे.  (Photo Credit : Icc X Account)

5 / 6
जो रुट लॉर्ड्समध्ये एका सामन्यातील दोन्ही डावात शतक करणारा चौथा फलंदाज ठरला. रुटआधी जॉर्ड हेडली. ग्रॅहम गूच आणि मायकल वॉन या तिघांनी अशी कामगिरी केली होती.  joe root lords (Photo Credit : Lords Cricket Ground X Account)

6 / 6
तसेच जो रुट कसोटी क्रिकेटमध्ये कॅचचं द्विशतक पूर्ण केलं. रुट कसोटी क्रिकेटमध्ये 200 कॅच घेणारा इंग्लंडचा पहिला तर एकूण चौथा खेळाडू ठरला. joe root lords (Photo Credit : Lords Cricket Ground X Account)