श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संपूर्ण संघ 427 धावा करून तंबूत परतला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात दोन शतकं पाहायला मिळाली. जो रूट आणि गस एटकिंसनने शतकी खेळी केली.
गस एटकिंसनने आठव्या स्थानावर उतरत शतक ठोकलं. आठव्या स्थानावर उतरून शतकी खेळी करणं खूपच कठीण आहे. पण एटकिंसनने ही कामगिरी केली. तसेच 22 वर्षे जुना अजित आगरकरचा विक्रम मोडीत काढला
इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानात आठ किंवा त्याच्या खाली फलंदाजीला येत शतकी खेळी करण्याचा विक्रम सहा खेळाडूंच्या नावावर आहे. अजित आगरने 2002 मध्ये आठव्या स्थानी उतरून शतक ठोकलं होतं.
अजित आगरकरने भारताच्या दुसऱ्या डावाच्या चौथ्या डावात शतक ठोकलं होतं. तेव्हा त्याने नाबाद 109 धावांची खेळी केली होती. या डावात अजित आगरकरने 16 चौाकार मारले होते.
इंग्लंडच्या रे इलिंगवर्थन 1969 साली आठव्या क्रमांकावर येत 113 धावांची खेळी केली होती. आात गस एटकिंसनने आठव्या स्थानावर येत 118 धावांची खेळी केली आहे. तसेच 14 चौकार मारले आहेत.