ENG vs WI : सॅम करनच्या नावावर नकोसा विक्रम, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी धु धु धुतला
वनडे वर्ल्डकपनंतर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने मोठा विजय मिळवला. वेस्ट इंडिजला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळवता आलं नव्हतं. त्यानंतर आता वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये राग दिसत आहे. इंग्लंडने 50 षटकात 326 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान वेस्ट इंडिजने 48.5 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात सॅम करनने सर्वात महागडा स्पेल टाकला.