फिल सॉल्टची वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी, संजू सॅमसनला मागे टाकत रचला विक्रम
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 8 गडी आणि 19 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात फिल्ट सॉल्ट नावाचं वादळ घोंगावलं. त्याने शतकी खेळीसह एक विक्रम रचला आहे.
1 / 5
वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला टी20 सामना इंग्लंडने जिंकला. या सामन्यात वेस्ट इंडिजने विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 16.5 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयात फिल सॉल्टची नाबाद शतकी खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने 54 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. यासह त्याने एका विक्रमाची नोंद केली आहे.
2 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त 13 यष्टीरक्षक फलंदाजांनी शतक झळकावलं आहे. यात फिल सॉल्टच्या नावावर सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. फिल सॉल्टने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तिसरं शतक झळकावलं आहे.
3 / 5
दोन शतकांसह फिल सॉल्ट संजू सॅमसन आणि सर्बियाच्या लेस्ली डनबरसोबत एकत्र पंगतीत बसला होता. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकवताच या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
4 / 5
फिल सॉल्टने तिन्ही शतकं वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावली आहेत. सॉल्टने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिलं शतक झळकावलं होतं. याच वर्षी विंडीजविरुद्ध दुसरं शतक ठोकलं. आता 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरं शतक झळकावलं आहे.
5 / 5
फिल सॉल्टने 54 चेंडूंचा सामना करत 6 उत्तुंग षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 103 धावा केल्या. या शतकाच्या जोरावर इंग्लंड संघाने 16.5 षटकात 2 गडी गमावून 183 धावा केल्या आणि 8 विकेट राखून विजय मिळवला.