Cancer | युवराज सिंह याच्यानंतर हा क्रिकेटर कॅन्सरच्या कचाट्यात, पुढे काय झालं?
टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराउंडर युवराज सिंह याला कॅन्सरशी झुंज द्यावी लागली होती. युवराजने या कॅन्सवर मात केली होती. त्यानंतर आता आणखी एका क्रिकेटरने कॅन्सरच्या कचाट्यात सापडला. या क्रिकेटरने याबाबतची माहिती दिलीय.
1 / 5
इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन सॅम बिलिंग्स तडाखेदार बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. सॅमने गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. सॅम बिलिंग्स याने त्याला कॅन्सर असल्याचा धक्कादायक माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सॅमला गेल्या वर्षी कॅन्सरच्या कचाटयात सापडला होता.
2 / 5
सॅम बिलिंग्स याला त्वचेचा कॅन्सर झाला होता. सॅम बिलिंग्स याने द टेलिग्राफला मुलाखत दिली. सॅमने या मुलाखतीत त्याच्यावर गेल्या वर्षी उपचार झाल्याचं सांगितलं. तसेच बिलिंग्सवर 2 शस्त्रक्रिया झाल्या.
3 / 5
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या लिमिटेड ओव्हरच्या सीरिजदरम्यान सॅम कपडे बदलत होता. तेव्हा सहकारी खेळाडूंना सॅमच्या छातीवर एक जखम दिसली. ही जखम पाहून त्याच्या सहकाऱ्यांना एकच धक्का बसला. यानंतर बिलिंग्सने तपासणी केली. त्यानंतर बिलिंग्सला त्वचेचा कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं.
4 / 5
सॅम बिलिंग्स याने या कॅन्सवर यशस्वीपणे मात केली. "उन्हात क्रिकेट खेळताना त्वचेचं नुकसान झालं", असं बिलिंग्स म्हणाला. आता मला जो त्रास सहन करावा लागला, तो माझ्या सहकाऱ्यांना होऊ नये, यासाठी सहकारी खेळाडूंनी उन्हात त्वचेची विशेष काळजी घ्यावी", असंही सॅमने नमूद केलं.
5 / 5
सॅमने आयपीएलमध्येही धमाका केलाय. सॅमने 2021 मध्ये दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच सॅम गेल्या मोसमात आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता.