World Cup 2023: इंग्लंड टीमच्या नावावर नकोसा विक्रम, अफगाणिस्तानने पराभूत करताच लाजिरवाणा रेकॉर्ड

| Updated on: Oct 16, 2023 | 3:01 PM

वनडे वर्ल्डकप इतिहासात सर्वात मोठा उलटफेर क्रीडाप्रेमींना पाहता आला. गजविजेत्या इंग्लंड संघाला अफगाणिस्तानने पराभवाची धूळ चारली. अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत करताच नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

1 / 6
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 13 वा सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगला. हा सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचं पारडं जड होतं. पण सामन्याचा निकाल भलताच लागला.अफगाणिस्तानने इंग्लंडला 69 धावांनी पराभूत केलं.

2 / 6
इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय अंगलट आला असंच म्हणावं लागेल. अफगाणिस्तानने 49.5 षटकात सर्वबाद 284 धावा केल्या आणि विजयासाठी 285 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडचा संघ 40.3 षटकात सर्वबाद 215 धावा करू शकला.

3 / 6
इंग्लंडच्या पराभवामुळे स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. उपांत्य फेरीसाठी पसंती मिळाली असताना साखळी फेरीतील पराभवामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुणतालिकेत मोठा फरक पडला असून उपांत्य फेरीची वाट बिकट होणार आहे.तसेच इंग्लंडच्या नावे नकोसा विक्रम प्रस्थापित झाला.

4 / 6
वनडे वर्ल्डकप इतिहासत सर्व टेस्ट खेळणाऱ्या संघांकडून पराभव स्वीकारणारा इंग्लंड पहिला संघ ठरला आहे. सध्या कसोटीचा दर्जा असलेल्या 11 देशांनी इंग्लंडला पराभूत केलं आहे.

5 / 6
इंग्लंडच्या पराभवाची मालिका 1975 पासून सुरु झाली होती. वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 1979 मध्ये अंतिम फेरीत वेस्ट इंडिजने, 1983 मध्ये भारताने, 1987 मध्ये पाकिस्तानने, 1983 मध्ये न्यूझीलंडने पराभूत केलं होतं.

6 / 6
1992 मध्ये इंग्लंडला मोठा धक्का बसला होता. तेव्हा झिम्बाब्वेने पराभूत केलं होतं. त्यानंतर 1996 मध्ये श्रीलंकेने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली होती. 2011 मध्ये बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता 2023 मध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत केलं आहे.  (सर्व फोटो : England Afghanistan Twitter)