टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 3000 दिवसानंतर इंग्लंडची खराब कामगिरी, काय झालं वाचा
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात इंग्लंडच्या पदरी नकोशी कामगिरी पडली आहे.टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 3000 दिवासानंतर 2016 सारखाच पेचप्रसंग घडला. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या
1 / 6
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत विजयी सुरुवात करण्याच्या इंग्लंडच्या आशेवर पाणी पडलं आहे. स्कॉटलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. तसेच टी20 वर्ल्डकपमध्ये युरोपियन संघाला पराभूत करण्याची इच्छाही धुळीस मिळाली आहे.
2 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 3000 दिवसानंतर असा प्रसंग घडला आहे. इंग्लंडला असाच काहीसा अनुभव 2016 मध्ये आला होता.
3 / 6
टी20 वर्ल्डकपमधील सहावा सामना स्कॉटलँड आणि इंग्लंड आमनेसामने आले होते. स्कॉटलँडच्या सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या 10 षटकात बिनबाद 90 धावा केल्या होत्या.
4 / 6
पावसामुळे सामना थांबला आणि जोर ओसरण्याची चिन्ह कमी असल्याने रद्द करण्याची वेळ आली. मात्र या 10 षटकांमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांना स्कॉटलंडची एकही विकेट घेता आली नाही. 3000 दिवसांनंतर पुन्हा एकदा लाजिरवाणा विक्रम केला आहे.
5 / 6
स्कॉटलंडच्या डावातील पहिल्या 6 षटकांमध्ये म्हणजेच पॉवरप्लेमध्ये एकही विकेट पडली नाही. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने विकेट मिळविण्यासाठी संघाच्या 5 गोलंदाजांचा वापर केला. मात्र एकालाही विकेट घेण्यात यश मिळाले नाही.
6 / 6
टी20 वर्ल्डकप 2016 मध्येही इंग्लंडची अशीच नाचक्की झाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये इंग्लंडला एकही विकेट घेता आली नव्हती. 18 मार्च 2016 रोजी झालेल्या त्या सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने बिनबाद 83 धावा केल्या होत्या.