कोलकाता येथे भारताविरुद्धच्या सामन्यानंतर इंग्लंड संघाने एक मोठा पल्ला गाठला आहे. ईडन गार्डन्सवरील या सामन्यासह इंग्लंडने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळण्याची कामगिरी केली आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सातवा संघ ठरला आहे.याआधी पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळले आहेत. आता या यादीत इंग्लंडचा समावेश झाला आहे.
इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या 200 टी20 सामन्यांपैकी 104 सामने जिंकले आहेत. तर 86 सामने गमावले आहेत.दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. तर उर्वरित 8 सामने काही कारणांमुळे रद्द झाले आहेत.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत 253 सामने खेळले असून यावेळी त्यांनी 144 सामने जिंकले आहेत. 98 सामन्यांपैकी 3 सामने बरोबरीत सुटले आहेत. तसेच 7 सामने काही कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत 243 सामने खेळले आहेत. यापैकी 161 विजय आणि 70 सामन्यात पराभव झाला आहे. काही कारणांमुळे 6 सामने रद्द झाले, तर 5 सामने बरोबरीत सुटले आहेत.