1..2..3..4… नाही..! इंग्लंडने कसोटीत ठोकल्या 5 लाख धावा, रचला मोठा इतिहास

| Updated on: Dec 07, 2024 | 3:22 PM

न्यूझीलंडविरुद दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा विजय पक्का झाला आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीतील भारताच्या वाटेतील एक प्रतिस्पर्धी संपणार आहे. कारण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात इंग्लंडकडे 533 धावांची मजबूत आघाडी असून 5 विकेट आहेत. असं असताना इंग्लंडने एका विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 6
इंग्लंडने कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात नवा विक्रम रचला आहे. इंग्लंडने 5 लाख धावांचा पल्ला गाठला आहे. इंग्लंडने संघाने 147 वर्षात 5 लाख धावा पूर्ण केल्या आहेत. यासह कसोटी क्रिकेटमध्ये एका विक्रमाची नोंद केली आहे.

2 / 6
दुसऱ्या कसोटी न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 280 धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ मात्र 125 धावांवरच बाद झाला. त्यामुळे इंग्लंडला 155 धावांची आघाडी मिळाली. त्यात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात 5 गडी गमवून 378 धावा केल्या आणि 533 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे.

3 / 6
इंग्लंडने 147 वर्षात 1082 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांची इंग्लंडची धावसंख्या मोजली तर 5 लाखांच्या पार गेली आहे. तर ऑस्ट्रेलियाने 4 लाख 28 हजार 794 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

4 / 6
इंग्लंड संघाच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी आतापर्यंत 929 शतकं ठोकली आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी 892 शतकं ठोकली आहेत.

5 / 6
भारतीय संघाने आतापर्यंत 586 कसोटी सामन्यांमध्ये 2 लाख 78 हजार 700 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा जगातील तिसरा संघ बनला आहे. पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत खूपच मागे आहे.

6 / 6
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांनी 552 शतकं ठोकली आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानंतर भारतीय फलंदाज तिसऱ्या स्थानावर आहेत.