विराट कोहलीवर आयपीएलमध्ये प्रचंड टीका झाली होती. त्यावेळी त्यानं केलेली कामगिरी ही खूप सुमार होती. पण, त्यानंतर त्यानं आशिया चषकात दाखवलेला फार्म हा पुन्हा एकदा उमेद देऊन गेला आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 सीरिजमध्ये त्यानं केलेली दमदार कामगिरी सर्वांच्या लक्षात राहिली.
हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या झालेल्या निर्णायक लढतीत टीम इंडियानं विजय मिळवला आणि सीरिज आपल्या नावावर केली. यात विराट कोहलीची मोठी भूमिका आहे.
VIRAT KOHLI
सिडनीमध्ये 41 चेंडूत 61 धावा केल्या होत्या. बंगळुरुत 30 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. तसंच आता हैदराबादमध्ये 48 चेंडूत 63 धावा केल्या आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.