Fifa Women’s World Cup 2023 : फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तीन सामन्यांचा थरार, असे रंगले सामने
फीफा वुमन्स वर्ल्डकप 2023 स्पर्धा हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तीन सामने रंगले. नायजेरिया आणि कॅनडा सामना बरोबरीत सुटला. तर स्वित्झर्लंड आणि स्पेनने बाजी मारली.
1 / 9
फीफा वुमन्स वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तीन सामने रंगले. पहिला सामना नायजेरिया आणि कॅनडा यांच्यात रंगला.
2 / 9
नायजेरिया आणि कॅनडाच्या खेळाडूंना गोल करण्यात अपयश आलं. त्यामुळे 90 मिनिटांचा खेळ संपल्याने सामना 0-0 ने बरोबरीत सुटला.
3 / 9
सामना बरोबरीत सुटल्याने कॅनडा आणि नायजेरिया दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला आहे. तर ब गटात ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या स्थानावर आहे. आयर्लंडचा संघ पराभवामुळे चौथ्या स्थानावर आहे.
4 / 9
फिलिपिन्स आणि स्वित्झर्लंड यांच्यात दुसरा सामना रंगला. हा सामना एक हाती स्वित्झर्लंडने जिंकला. 2-0 ने हा सामना स्वित्झर्लंडने जिंकला.
5 / 9
फॉरवर्ड प्लेयर बॅचमन आणि पियुबेल यांनी गोल झळकावले.पहिल्या सत्राच्या 45 व्या मिनिटाला रामोना बॅचमनने गोल मारला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात 64 व्या मिनिटाला सेरेना पियुबेलने गोल मारत 2-0 ने आघाडी घेतली.
6 / 9
फिलिपिन्सच्या खेळाडूंना सामना आपल्या बाजूने झुकावा यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आलं. अखेर हा सामना स्वित्झर्लंडने 2-0 ने जिंकला.
7 / 9
स्पेन आणि कोस्टरिका यांच्यात तिसरी लढत झाली. हा सामना स्पेनने 3-0 ने जिंकला. सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच कोस्टारिका मिळाली नाही.
8 / 9
खरं तर या सामन्यात स्पेन पूर्णपणे हावी झाल्याचं दिसून आलं. सामन्यात अर्ध्याहून अधिक काळ चेंडू स्पेनच्या ताब्यात होत असं दिसलं. कोस्टारिकाचे खेळाडू पुरते हैराण झाले होते.
9 / 9
कोस्टारिकाकडून सामन्यात पहिलीच चूक घडली. वेलिरिया डेल कॅम्पोकडून पहिला स्वगोल गेला. त्यामुळे तिथेच आत्मविश्वास खालावला. ऐटना बोनमटीने 23 व्या मिनिटाला दुसरा, तर एसथर गोन्झालेजने 27 मिनिटाला तिसरा गोल मारला. (फोटो- फीफा ट्विटर))