आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा झिरो मिळवणारे पाच फलंदाज, यादीत तीन भारतीय

| Updated on: Mar 15, 2025 | 5:08 PM

आयपीएल स्पर्धेत फलंदाजांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने आयपीएल ही स्पर्धा गोलंदाजांसाठी मारक ठरते. पण या स्पर्धेतही काही फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम आहे. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम नोंदवला आहे.

1 / 6
आयपीएल स्पर्धेत अनेक मोठे विक्रम होतात आणि मोडतात. संपूर्ण स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा जोरदार वर्षाव होतो. आयपीएलमध्ये असे काही फलंदाज आहे त्यांना अनेकदा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं आहे.

2 / 6
ग्लेन मॅक्सवेल: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत एकूण 18 वेळा मॅक्सवेल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

3 / 6
दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये एकूण 18 वेळा शून्यावर बाद झाला आहे. कार्तिकने त्याच्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. मात्र गेल्या दोन हंगामात आरसीबीचा भाग होता आणि फिनिशर म्हणून त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली.

4 / 6
मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्माचे नावही या यादीत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये हिटमॅनला 17 वेळा खाते न उघडता परतावं लागलं आहे.

5 / 6
फिरकीने फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये ढकलण्याचे कौशल्य असलेला पियुष चावला आयपीएलमध्ये 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे. याशिवाय, आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पियुष दुसऱ्या क्रमांकावर आहे.

6 / 6
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा सुनील नरेन या लीगमध्ये 16 वेळा बाद झाला आहे. नरेन त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. पॉवरप्लेमध्ये सलामीवीर म्हणून चौकार आणि षटकारांचा वर्षाव करतो. (फोटो- टीव्ही 9 कन्नड)