IPL Auction : आयपीएल लिलावात भारतीय खेळाडूंनी खाल्ला भाव, या पाच खेळाडूंना मिळाले कोट्यवधी रुपये
आयपीएल मेगा लिलावात कोट्यवधी रुपयांची पहिल्याच दिवशी लागली. फ्रेंचायझींनी भारतीय खेळाडूंसाठी आपली तिजोरी रिती केल्याचं पाहायला मिळालं. आयपीएल लिलावात पहिल्यांदाच भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला. पाच खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागली.
1 / 6
आयपीएल लिलावात पहिल्या दिवशी 14 सेट पार पडले. एकूण 84 खेळाडूंवर बोली लागली. यात 72 खेळाडूंना खरेदीदार मिळाले. तर 12 खेळाडू अनसोल्ड राहिले. लिलावात पाच भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक भाव खाल्ला.
2 / 6
मेगा लिलाव सुरू होण्यापूर्वीच ऋषभ पंतच्या नावावर मोठी बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. लखनौ सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी पंतसाठी बोली लावी. मात्र, अखेर लखनौने 27 कोटी रुपये देऊन ते विकत घेतले.
3 / 6
कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवणारा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खरेदीसाठी चुरशीची लढत झाली. लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्जमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेरीस 26.75 कोटी रुपयांच्या बोलीसह पंजाब किंग्सने अय्यरला घेतलं.
4 / 6
केकेआरने वेंकटेश अय्यरसाठी मोठी बोली लावली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता यांच्यात बोली युद्ध रंगलं होतं. अखेर केकेआरने वेंकटेशला 23.75 कोटी रुपयांना विकत घेतलं.
5 / 6
युजवेंद्र चहलला टीम इंडियात संधी नसली तरी त्याची मागणी काही कमी झालेली नाही. पंजाब किंग्सने चहलला 18 कोटी रुपये घेत संघात घेतलं. लिलावातील सर्वात महागडा फिरकीपटू ठरला.
6 / 6
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा अर्शदीप सिंगला संघात समाविष्ट करण्यासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादने अर्शदीपसाठी 15.75 कोटींची अंतिम बोली लावली. पण पंजाब किंग्सने राईट टू मॅच कार्डचा वापर केला. अर्शदीपला 18 कोटी रुपये देऊन संघात घेतलं.