कोट्यवधींची संपत्ती असलेल्या महिला क्रिकेटपटू, तीन भारतीयांचा समावेश
पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटची क्रेझ गेल्या काही वर्षात वाढली आहे. इतकं काय तर महिला क्रिकेटपटूही कोट्यवधींची कमाई करत आहेत. टॉप पाच महिला क्रिकेटपटूंमध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे.
1 / 5
सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटरच्या यादीत सर्वात पहिले नाव येते ते ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिस पॅरीचे. पॅरीचे सौंदर्य आणि तिच्या खेळाची अनेकदा चर्चा होते. तिची एकूण संपत्ती 1 अब्ज 14 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. (Ellyse Perry instagram)
2 / 5
ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग ही दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकूण संपत्ती 73 कोटींच्या जवळपास आहे. तिच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया T20 क्रिकेटमध्ये वर्ल्डकप जिंकला होता. (Meg Lanning instagram)
3 / 5
भारताची माजी कर्णधार मिताली राज ही जगातील तिसरी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकूण संपत्ती 41 कोटींहून अधिक आहे. मितालीने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Mithali Raj instagram)
4 / 5
स्मृती मंधना ही जगातील चौथी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकूण संपत्ती 34 कोटींच्या जवळपास आहे. मंधाना ही महिला प्रीमियर लीगमधील सर्वात महागडी खेळाडू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला 3.4 कोटी रुपयांना संघात सहभागी केलं आहे. (smriti mandhana instagram)
5 / 5
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर ही जगातील 5वी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकूण संपत्ती 24 कोटींहून अधिक आहे. हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने 1.8 कोटी रुपयांमध्ये संघात सहभागी केलं आहे. (Getty)