ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप जेतेपदासाठी सुरेश रैना याची या संघांना पसंती, वाचा कोण आहे यादीत
वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 8 ऑक्टोबर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या पहिला सामना होत आहे. या स्पर्धेत कोणता संघ जेतेपदासाठी दावेदार ठरू शकतो, याबाबत सुरेश रैना याने भाकीत केलं आहे.
1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दहा संघ आहेत. यापैकी पाच संघांना सुरेश रैना याने पसंती दिली आहे. सुरेश रैना याच्या म्हणण्यानुसार, पाच संघांपैकी चार संघ उपांत्य फेरीत नक्कीच असतील.
2 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार असल्याने टीम इंडियाला पहिली पसंती दिली जात आहे. 2011 नंतर भारतात पुन्हा एकदा वर्ल्डकप भारतात होत आहे. रैनाने सांगितलं की, गेल्या वेळी आम्ही जिंकलो असल्याने यावेळी जेतेपदासाठी टीम इंडियाला पसंती आहे.
3 / 6
ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानासाठी पसंती आहे. ऑस्ट्रेलियाची आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. त्यामुळे यावेळीही ऑस्ट्रेलिया संघाकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरी गाठेल.
4 / 6
गतविजेत्या इंग्लंड संघात सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे हा संघही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकतो. तसेच जेतेपद कायम राखण्यात यश मिळू शकते.
5 / 6
भारत आणि श्रीलंकेच्या मैदानांची स्थिती जवळपास सारखीच आहे. त्यामुळे श्रीलंका संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मोक्याच्या क्षणी श्रीलंका उभारी घेऊ शकतो. त्यामुळे लंकन संघ उपांत्य फेरीत दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
6 / 6
आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला पाकिस्तान संघाकडूनही सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. एकदिवसीय विश्वचषक भारतात होत असल्याने पाकिस्तान संघाला परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड जाणार नाही.