IPL 2024 : माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेने प्लेऑफसाठी या चार संघांना दिली पंसती, म्हणाला…

| Updated on: Apr 01, 2024 | 2:45 PM

आयपीएल 2024 स्पर्धेची रंगत दिवसागणिक वाढत चालली आहे. चार संघांमध्ये प्लेऑफसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे कोणते संघ अंतिम फेरी गाठतील याची उत्सुकता वाढली आहे. माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे याने प्लेऑफसाठी चार संघांना पसंती दिली आहे. चला जाणून घेऊयात यात कोणते संघ आहेत ते

1 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत सुरुवातीच्या टप्प्यातील 13 सामने पार पडले आहेत. मुंबई इंडियन्स वगळता सर्वच संघांनी आपल्या विजयाचं खातं खोललं आहे. साखळी फेरीतील तिसरा टप्पा सुरु असताना माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी प्लेऑफसाठी चार संघांना पसंती दिली आहे. सध्याच्या कामगिरीच्या आधारावर अनिल कुंबळे यांनी हे भाकीत केलं आहे.

2 / 6
अनिल कुंबळे यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितलं की, 'राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहोचेल. राजस्थानचा संघ सर्वच बाजूंनी परिपूर्ण आहे. तसेच सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये एन्ट्री मारेल.'

3 / 6
मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा दुसरा संघ ठरेल. मुंबई इंडियन्सने साखळी फेरीत निश्चित चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचेल, असं कुंबळेने सांगितलं.

4 / 6
कोलकाता नाईट रायडर्सची स्पर्धेतील विजयी घोडदौड सुरु आहे. संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. आंद्रे रसेल, सुनील नरेन, रिंकू सिंग सध्या फॉर्मात आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता प्लेऑफमध्ये पोहोचेल, असा विश्वास अनिल कुंबळेने व्यक्त केला आहे.

5 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा चौथा संघ असेल. आरसीबीने मागच्या पर्वातही बाद फेरी गाठली होती. त्यामुळे आरसीबी प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार असंही त्यांनी पुढे सांगितलं.

6 / 6
राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवतील असा विश्वास अनिल कुंबळे यांना आहे. आता हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील की नाही हे पाहावे लागेल.