इंग्लंडच्या माजी क्रिकेटरचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत खळबळजनक विधान, सांगितलं असं काही
कसोटी क्रिकेटची स्थिती चांगली करण्यासाठी आयसीसीने 2019 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे दोन पर्व पार पडले असून तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. अंतिम फेरीचा सामना 2025 ला खेळला जाणार आहे. पण इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
1 / 6
कसोटी क्रिकेटची स्थिती चांगली करण्यासाठी आयसीसीने 2019 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे दोन पर्व पार पडले असून तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. अंतिम फेरीचा सामना 2025 ला खेळला जाणार आहे.
2 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिसरं पर्व सुरु झालं आहे. दोन वर्षे वेगवेगळ्या देशात होणाऱ्या कसोटी मालिकांच्या निकालावर गुणांकन केलं जातं. विजयी टक्केवारीत टॉप दोनला असलेले संघ अंतिम फेरीचा सामना खेळतात.
3 / 6
पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-2021, तर दुसरी कसोटी चॅम्पियनशिप 2021-2023 दरम्यान झाली होती. आता तिसरं सर्कल 2023-2025 या दरम्यान सुरु असून नऊ संघ शर्यतीत आहेत.
4 / 6
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क बूचरने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे कसोटी क्रिकेटचं नुकसान झाल्याचा दावा केला आहे. वर्ल्ड टेस्टमुळे ही स्पर्धा अपरिहार्य ठरत आहे. त्यात कसोटी वाचवण्याऐवजी त्याचं नुकसानच होताना दिसत आहे.
5 / 6
दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीसाठी दुय्यम संघ निवडला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 14 जणांच्या संघात सात नव्या खेळाडूंचा समावेश केला आहे. यावर संताप व्यक्त करत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने आयसीसी आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे.
6 / 6
इंग्लंडला आता भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. जानेवारीच्या अखेरीस सुरू झालेली ही मालिका मार्च महिन्यात संपणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने दोन वेळा हजेरी लावली. पण जिंकता आलं नाही.