लोक बिशन सिंग बेदींचे उत्तराधिकारी म्हणायचे, 11 वर्षात 100 रन्सही नाही केले, वयाच्या 27 वर्षी करिअर संपलं!
मनिंदर सिंग जेव्हा टीम इंडियामध्ये आले तेव्हा त्यांना बिशनसिंग बेदींचा उत्तराधिकारी म्हटलं जात असे. ते बिशनसिंग बेदींसारखे डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करीत असे परंतु त्यांचे करियर वयाच्या केवळ 27 व्या वर्षी संपलं. Maninder Singh born on this day
1 / 5
हा खेळाडू जेव्हा टीम इंडियामध्ये आला तेव्हा त्याला बिशनसिंग बेदींचा उत्तराधिकारी म्हटलं जात असे. तो बिशनसिंग बेदींसारखा डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करीत असे परंतु त्याचे करियर वयाच्या केवळ 27 व्या वर्षी संपलं. या क्रिकेटपटूची कहाणी भारतीय क्रिकेटमधील निराशाजनक कहाण्यांपैकी एक असू शकते. पुढे क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर या खेळाडूचे नाव अनेक वादांशी संबंधित होते. मनिंदर सिंग असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 13 जून 1965 रोजी पुण्यात झाला.
2 / 5
मनिंदर सिंगने पाकिस्तानविरुद्ध 1982-83 च्या कराची कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांचे वय 17 वर्षे 193 दिवस होते. यासह, त्यावेळी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरले. मनिंदर सिंग भारताकडून 35 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 37 च्या सरासरीने 88 बळी घेतले. त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती 27 धावांत 7 गडी बाद.... आणि 59 एकदिवसीय सामन्यात त्यांनी 66 बळी घेतले. त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती 22 धावांत चार गडी बाद...
3 / 5
मनिंदरसिंगच्या कारकीर्दीची सुरुवात चांगली झाली पण अचानक त्यांची लय गेली. यामुळे त्यांना संघातून वगळण्यात आले. त्यानंतर ते पूर्वीसारखं कधीच खेळू शकले नाहीत. अशाप्रकारे, 1993 मध्ये त्यांनी भारताकडून शेवटचा सामना खेळला. त्यावेळी त्याचं वय केवळ 27 वर्ष होतं.
4 / 5
मनिंदर सिंगच्या नावे नकोसा रेकॉर्ड आहे. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी त्यांच्या संपूर्ण कसोटी कारकीर्दीत 100 धावा केल्या नाहीत. तसेच 1986-87 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मद्रास कसोटी रोमांचक झाली, या कसोटीत ते सर्वांत शेवटी आऊट झालेले फलंदाज होते. त्यामुळे सामना टाय झाला होता.
5 / 5
दुसरीकडे, मनिंदरसिंग क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर अधिकच वादात राहिले. त्यांना दारूचं व्यसन होतं. 2007 मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला कोकेन बाळगल्याबद्दल अटक केली. त्याच्या घरातून 1.5 ग्रॅम कोकेन सापडल्याचा पोलिसांचा आरोप होता. मात्र, 2012 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली.