गौतम गंभीर हा कायमच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. महेंद्रसिंह धोनीवर त्याने अनेकदा टीका केली आहे. त्यामुळे अनेकदा ट्रोलही झाला आहे. मात्र त्याने आपला आक्रमक अंदाज काही सोडला नाही.
आशिया कप 2023 स्पर्धेत गौतम गंभीर समालोचकाच्या भूमिकेत आहे. सामना सुरू असताना गौतम गंभीर काही जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. तसेच काही गंभीर वक्तव्यही करत आहे. आता अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
गौतम गंभीर याने स्टार स्पोर्ट्सवर इरफान पठाण आणि जतिन सप्रू यांच्याशी चर्चा करताना आपल्या करिअरमधील एक खुलासा केला आहे. यामुळे गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
चर्चेदरम्यान गौतम गंभीर याने नेपियर कसोटीची आठवण काढली. हा सामना मार्च 2009 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. हा सामना ड्रॉ झाला होता.
कसोटीत भारतीय संघाला फॉलोऑन मिळाला होता. यानंतर गौतम गंभीर याने अडीच दिवस बॅटिंग करून सामना ड्रॉ केला. दुसऱ्या डावात गौतम गंभीरने 436 चेंडूंचा सामना करत 137 धावा केल्या होत्या. आता या खेळीबाबत एक खुलासा केला आहे.
गौतम गंभीर याने सांगितलं की, खूप कमी लोकं विचारतात की अडीच दिवस बॅटिंग कशी केली ते? त्यावर उत्तर देत स्वत:च सांगितलं की "मी अडीच दिवस लंचमध्ये, टी ब्रेकवेळी आमॅचच्या आधी आणि नंतर.. आपल्या रुममध्ये..रात्रभर हनुमान चालीसा ऐकली"