ODI World Cup : 2011 वर्ल्डकप स्पर्धेत धोनी याने शेवटी मारलेल्या ‘त्या’ षटकाराबाबत गंभीरनं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला..

| Updated on: Aug 24, 2023 | 10:32 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे. वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत असेल.

1 / 6
भारताने गेल्या 10 वर्षात एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद जिंकून दुष्काळ संपवण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

2 / 6
टीम इंडियाने पहिल्यांदा 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता.

3 / 6
2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीचा सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रंगला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी याने षटकार मारत सामना जिंकवला होता. त्याला प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

4 / 6
अंतिम फेरीत गौतम गंभीर याने 97 धावांची खेळी केली होती. दुसरीकडे युवराज सिंह याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटने गौरविण्यात आले होते. पण चाहते आजही धोनीच्या त्या षटकाराची चर्चा करत आहे. यावर गंभीरने एका मुलाखतीत संताप व्यक्त केला आहे.

5 / 6
गौतम गंभीर याने सांगितलं की, "एक खेळाडू स्पर्धा जिंकवू शकत नाही. जर असं झालं असतं तर भारत सर्व वर्ल्डकप जिंकला असता. मी 97 धावा केल्या त्याबाबत काही बोलू नका. पण युवराज सिंह, जहीर खान आणि मुनाफ पटेल यांनीही चांगली कामगिरी केली होती."

6 / 6
"सचिन तेंडुलकर यानेही या वर्ल्डकपमध्ये तीन ते चार शतकं ठोकली होती. किती लोकांना याबाबत माहिती आहे. लोकं आजही त्या एका षटकाराबाबतच चर्चा करत आहेत. हे फक्त मीडिया आणि सोशल मीडियामुळे झालं आहे.", असंही गंभीर पुढे म्हणाला.