गौतम गंभीरने केलं रोहित शर्माचं कौतुक, पण असं बोलून गेला की विराट कोहलीचे चाहते भडकले

| Updated on: Oct 30, 2023 | 9:16 PM

वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. सहा पैकी सहा सामने जिंकत टीम इंडियाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. रोहित शर्मा चांगला फॉर्मात आहे. गौतम गंभीर याने त्याचं कौतुक केलं. पण विराटच्या चाहत्यांना राग आला आहे.

1 / 6
रोहित शर्मा टीम इंडियाला आघाडीला येत चांगली सुरुवात करून देतो. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर तो पुन्हा एकदा ट्रॅकवर आला आहे. अफगाणिस्तान विरुद्ध 84 चेंडूत 131 धावा केल्या.

2 / 6
पाकिस्तान विरुद्ध 86 धावा, बांगलादेश विरुद्ध 48 धावा, न्यूझीलंड विरुद्ध 46 धावा आणि इंग्लंड विरुद्ध 87 धावा केल्या. रोहित शर्माचं कौतुक करताना गौतम गंभीर म्हणाला की, रोहितने 40-45 शतकं आधीच केली असती. पण तो स्वत:साठी नाही तर संघासाठी खेळतो. वैयक्तिक कामगिरीपेक्षा त्याने सांघिक कामगिरीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. (Photo : Twitter)

3 / 6
गंभीरने अप्रत्यक्षरित्या विराट कोहलीवर निशाणा साधला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली शतकासाठी एकेरी धाव घेत नव्हता. पण सरते शेवटी त्याने षटकार मारून शतक पूर्ण केलं.

4 / 6
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र संघाच्या धावांमध्ये भर व्हावी यासाठी त्याने फटकेबाजी करण्याचा निर्णय घेतला, अशी क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा आहे. या सामन्यात विराट खातं न खोलता तंबूत परतला होता. (Photo : Twitter)

5 / 6
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने इंग्लंडविरुद्ध 47 धावा करताना एक मोठी कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. (Photo : Twitter)

6 / 6
रोहित शर्माने वनडे कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 257 सामने खेळले आहेत. त्याने 31 शतकं आणि 54 अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तीन द्विशतके करणारा तो एकमेव खेळाडू ठरला. (Photo : Twitter)