सौरव गांगुलीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधारपदासाठी या खेळाडूला दिला जाहीर पाठिंबा, बीसीसीआयसमोर मोठा पेच
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अजूनही पाच महिन्यांचा कालावधी आहे. असं असलं तरी स्पर्धेचं बिगुल वाजलं असून वेळापत्रक जाहीर झालं आहे. दुसरीकडे, टीम इंडियाच्या टी20 संघाच्या कर्णधारपदावरून पेच निर्माण झाला आहे. असं असताना माजी कर्णधार सौरव गांगुलीने मनमोकळेपणाने आपलं मत जाहीर केलं आहे.
1 / 7
टीम इंडियाचा अफ्रिका दौरा यशस्वी ठरला. वनडे मालिका जिंकल्याननंतर वनडे आणि टेस्ट मालिका बरोबरीत सोडवली. आता टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास सज्ज आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे.
2 / 7
रोहित शर्मासोबत या मालिकेसाठी विराट कोहलीही संघात परतला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू दिसले तर आश्चर्य वाटायला नको. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व कोणी करावं? हा पेच निर्माण झाला आहे. त्यावर सौरव गांगुलीने आपल्याकडून नावाची घोषणा केली आहे.
3 / 7
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत रोहित शर्माने टीम इंडियाचं नेतृत्व करावं. तसेच विराट कोहलीही संघात असावा असं मत गांगुलीने जाहीर केलं आहे. दोघंही 14 महिन्यांच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय टी20 मालिका खेळणार आहेत.
4 / 7
विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं गेलं आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4008 धावांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
5 / 7
या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माची कामगिरीही उल्लेखनीय ठरली असून त्याने 3853 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय टी20 मध्येही त्याने चार शतके झळकावली आहेत.
6 / 7
विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत सौरव गांगुलीने उद्योन्मुख यशस्वी जयस्वालचं कौतुक केलं आहे. भविष्यात यशस्वी जयस्वाल मैलाचा दगड ठरेल असं त्याने सांगितलं. कसोटीत त्याची कामगिरी हवी तशी राहिली नाही. पण टी20 चमकदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
7 / 7
"पराभव झाल्यानंतर टीका होते. संघाबाबत बरंच काही बोललं जातं. पण टीम इंडिया एक जबरदस्त संघ आहे. त्याच्या कारकिर्दीची ही सुरुवात आहे. त्याच्यापुढे अनेक संधी आहेत.", असं सौरव गांगुलीने पुढे सांगितलं.