ग्लेन मॅक्सवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा, बिग बॅश लीगमध्ये असा विक्रम नोंदवणारा पहिला खेळाडू
बिग बॅश लीगमध्ये ग्लेन मॅक्सवेलने एका विक्रमाची नोंद केली आहे. मॅक्सवेलने ख्रिस लीनच्या नावावर असलेला गेल्या काही वर्षापासूनचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच 1955 चेंडूत अशी कामगिरी करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे.
1 / 5
बिग बॅश लीग स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. या स्पर्धेतील 28व्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने अर्धशतकी खेळी केली. मेलबर्नच्या एमसीजी मैदानावर सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात 32 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली.
2 / 5
बिग बॅश लीगमध्ये 58 धावांच्या खेळीसह 3 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा बिग बॅश लीगमधील पाचवा फलंदाज ठरला आहेय . पण या लीगमध्ये 3000 धावांचा पल्ला झटपट गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
3 / 5
ग्लेन मॅक्सवेलपूर्वी हा विक्रम ख्रिस लीनच्या नावावर होता. 2011 पासून बिग बॅश लीग खेळत असलेल्या ख्रिस लीनने 2016 चेंडूत 3000 धावांचा पल्ला गाठला होता. त्यामुळे जलद 3000 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. पण आता हे चित्र पालटलं आहे.
4 / 5
ग्लेन मॅक्सवेलने 1955 चेंडूत 3000 धावा पूर्ण करत इतिहास रचला आहे. बिग बॅश लीगमध्ये 2000 पेक्षा कमी चेंडूत 3000 धावा करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.
5 / 5
बिग बॅश लीगमध्ये ग्लेन मॅक्सवेल आतापर्यंत 110 डाव खेळला आहे. यात 2 शतकं आणि 19 अर्धशतकांच्या जोरावर 3047 धावा केल्या आहेत. आता पाचव्या क्रमांकावरून पहिल्या स्थानावर झेप घेण्यासाठी 862 धावांची गरज आहे. ख्रिस लीनच्या नावावर 3908 धावा आहेत.