GT vs CSK Final IPL 2023 : महेंद्रसिंह धोनीच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? अंतिम सामन्यानंतर करणार मोठी घोषणा
IPL 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
1 / 7
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या पर्वातील अंतिम सामना होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत.
2 / 7
सीएसकेने आजच्या सामन्यात विजय मिळवला तर पाचव्यांदा ट्रॉफी जिंकतील. गुजरात जिंकल्यास सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी पटकावण्याचा मान मिळेल. दरम्यान, एमएस धोनी आणि शुभमन गिल या सामन्यात ऐतिहासिक विक्रमासाठी सज्ज आहेत.
3 / 7
महेंद्रसिंह धोनी आज निवृत्त होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आयपीएल 2023 सुरू झाल्यापासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. याबाबत धोनीसह कोणीही अद्याप कोणतीही ठोस माहिती उघड केलेली नाही.
4 / 7
MS Dhoni
5 / 7
निवृत्तीनंतर धोनी सीएसके संघाचा प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे. दरम्यान धोनीने एका सामन्यादरम्यान सांगितलं होतं की, 'माझ्याकडे निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी अजून 8 ते 9 महिने आहेत. मी खेळत असलो किंवा संघापासून दूर असलो तरी, मी नेहमीच चेन्नई सुपर किंग्सचा समर्थक राहीन.
6 / 7
धोनीने अप्रत्यक्षपणे सांगितले की, ही त्याची शेवटची आयपीएल आहे कारण त्याच्याकडे आठ ते नऊ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे पुढच्या पर्वात खेळाडू म्हणून नसेल हे त्याने अप्रत्यक्षरित्या सांगितलं आहे. दुसरीकडे, तो प्रशिक्षकाची भूमिका बजावेल की नाही याबाबत काहीच खुलासा नाही. तो चेन्नई सुपर किंग्ज संघासोबतच राहणार आहे.
7 / 7
एमएस धोनी सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. असं असतानाही तो क्रिकेट सामने खेळत आहे. आयपीएल संपल्यानंतर धोनीवर उपचार केले जातील. पण आज निवृत्ती जाहीर करून चेन्नईला विजयासह अलविदा करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.