इंग्लंडमध्ये तुफानी खेळी, हरमनप्रीतनं केली सचिनची बरोबरी
Harmanpreet Kaur New Record : हरमनप्रीतनं सचिन तेंडुलकरच्या खास विक्रमाची बरोबरी केलीय. भारताच्या महिला क्रिकेट संघानं वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके झळकावण्यात अव्वल क्रमांकावर पोहोचली आहे.
1 / 5
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर लांब षटकार मारण्यासाठी ओळखली जाते. इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही तिनं असंच काहीसं केलंय. हरमनप्रीत कौरनं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 111 चेंडूत 143 धावांची खेळी करत टीम इंडियाला ऐतिहासिक मालिका जिंकून दिली. भारतानं इंग्लंडमध्ये 23 वर्षांनंतर एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा पराभव केला.
2 / 5
हरमनप्रीतनं 100 चेंडूत शतक पूर्ण केलं पण पुढच्या 11 चेंडूत 43 धावा केल्या. हरमनप्रीतनं शेवटच्या 11 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
3 / 5
हरमनप्रीतनंही इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सचिननं 3 एकदिवसीय शतके झळकावली आहेत. आता हरमनप्रीतच्या नावावर 3 शतके आहेत.
4 / 5
हरमनप्रीतनं 2022मध्ये अप्रतिम कामगिरी केलीय. तिनं 15 डावात 750 धावा केल्या असून 5 अर्धशतके आणि 2 शतके झळकावलंय.
5 / 5
हरमनप्रीतच्या नावावरही इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम आहे. तिनं डेबी हॉकलीचा विक्रम मोडला जिनं इंग्लंडविरुद्ध त्याच्याच भूमीवर 117 धावा केल्या.