हरमनप्रीत कौर हिचा पंचांशी पंगा! कॅप्टन कूल धोनीसह या कर्णधारांनी केलं असंच काही

| Updated on: Jul 24, 2023 | 4:40 PM

बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात पंचांच्या निर्णयामुळे हरमनप्रीत कौर चांगलीच संतापली होती. पंचांचा निर्णय चुकीचा होत असं थेट सांगत तिने स्टंपवर बॅट मारली होती. असं कृत्य करणारी हरमनप्रीत कौर ही काय पहिलीच क्रिकेटपटू नाही. यापूर्वी असंच काहीसं घडलं आहे.

1 / 6
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या चर्चेत आहे. बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णयाक वनडे सामन्यात पंचांशी घातलेल्या वादामुळे चर्चा होत आहे. तिने रागाच्या भरात स्टंपवर बॅट मारली. तसेच पॅव्हेलियनमध्ये जाताना पंचांना खडे बोल सुनावत गेली. पण ही क्रिकेट इतिहासातील पहिलीच घटना नाही. यापूर्वीही कर्णधारांनी पंचांसोबत वाद घातला आहे. (AFP Photo)

2 / 6
इंग्लंडचा संघ 1987 साली पाकिस्तान दौऱ्यावर होता. फैसलाबादमध्ये कसोटी मालिका खेळली गेली. त्यावेळी या सामन्यात शकूर राणा पंचांची भूमिका बजावत होते. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी इंग्लंडचा कर्णधार माइक गेटिंग आणि पंच राणा यांच्यात वाद झाला. एडी हेम्मिंग्स चेंडू टाकणार इतक्यात पंचांनी त्याला थांबण्यास सांगितलं. गेटिंग गोलंदाजीवेळी क्षेत्ररक्षणात बदल करत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर गेटिंगने खेळाडूला जागेवर उभं राहण्यास सांगितलं होतं, असा युक्तिवाद केला. यामुळे वाद वाढला आणि शेवटी गेटिंगला माफी मागण्यास सांगितलं. पण त्याने नकार दिल्याने तिसऱ्या दिवशीचा खेळ होऊ शकला नाही. अखेर गेटिंगने राणा यांची माफी मागितली. (AFP Photo)

3 / 6
श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन राणातुंगा आणि पंचांमध्ये वाद झाला होता. इतकंच काय तर संपूर्ण संघाला घेऊन ते बाहेर पडले होते. 199 साली श्रीलंकन संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. वनडे सामन्यादरम्यात अंपायर टोनी मॅक्किलनने मुथय्या मुरलीधरनच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला. त्यामुळे राणातुंगा नाराज झाला.तसेच संपूर्ण संघाला बाहेर नेल. त्यानंतर श्रीलंकन मॅनेजरने यात दखल घेतली आणि संघ मैदानात परतला. (AFP Photo)

4 / 6
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या 2006 मध्ये ओव्हल मैदानात सामना खेळला जात होता. त्यावेळी डेरेल हेयर पंच होते. त्यांनी पाकिस्तान संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप लावला होता. तसेच इंग्लंडला पाच धावांची पेनल्टी दिली. यामुळे पाकिस्तानचा कर्णधार इंजमाम उल हक नाराज झाला. तसेच पंचांशी वाद घातला. तसेच पाकिस्तानचा संघ टी ब्रेकनंतर मैदानात उतरला नाही. जवळपास 45 मिनिटं वाट पाहिल्यानंतर हेयरने सामन्याचा निकाल इंग्लंडच्या बाजूने दिला. (AFP Photo)

5 / 6
महेंद्रसिंह धोनीची कॅप्टन कूल म्हणून ख्याती आहे. मैदानावर शांतपणे निर्णय घेणारा कर्णधार म्हणून ओळख आहे. पण धोनीने सुद्धा पंचांशी वाद घातला होता. 2012 साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. वनडे सामन्यात सुरेश रैनाच्या गोलंदाजीवर माइक हसीला स्टपिंग केले. त्यानंतर निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. त्यानंतर हसी क्रिजमध्ये आल्याचं स्पष्ट दिसत होतं. पण स्क्रिनवर आऊट लिहून आला आणि हसी जाऊ लागला. पण बिली बाउडन याने हसीला पुन्हा बोलवलं. यामुळे धोनी नाराज झाला आणि बाउडनसोबत वाद घातला. (AFP Photo)

6 / 6
रिकी पॉटिंग हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने अनेकदा पंचांशी वाद घातला आहे. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना मेलबर्नमध्ये इंग्लंडशी होता. ऑस्ट्रेलियने फलंदाज केविन पीटरसन विरुद्ध जोरदार अपील केली. पण पंच अलीम दार यांनी आऊट दिला नाही. इतकंच काय तर डीआरएस पण गेला. त्यामुळे पॉटिंगचा पारा चढला आणि पंचांशी वाद घातला. पीटरसनसोबतही त्याने त्यावेळी वाद घातला. (AFP Photo)